आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Friends Murdered In Gangwar At Kolhapur, Eight Arrested

कोल्हापुरात टोळीयुद्धातून दोन मित्रांचा खून, आठ जणांना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - टोळीयुद्ध आणि जुगार क्लबच्या व्यवहारातून दोन मित्रांचा रविवारी खून झाला होता. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. समीर शिराज खाटीक व नितीन महादेव शिंदे या दोघांचा खून झाला होता.
रेल्वे फाटक परिसरातीलच युवकांच्या टोळीने हा खून केल्याची शंका समीरची आई अरुणा खाटीक यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार तपास केला असता याच परिसरातील युवकांनी हे खून केल्याचे स्पष्ट झाले. मृत्यू झालेल्या दोघांवरही मारामारीचे गंभीर गुन्हे दाखल झाले होते.