आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगलीत दोन गर्भवती बहिणींचा विहीरीत पडून मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली- स्वयंपाकासाठी जळण गोळा करायला गेलेल्या दोन गरोदर बहिणींचा विहीरीत पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे सोमवारी ही घटना घडली.

तासगाव शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर गोसावी समाजाची वस्ती आहे. येथील काजल दीपक जाधव (वय 18) आणि अमिना सचिन जाधव (20) या दोघी सकाळी स्वयंपाकासाठी जळण गोळा करायला दत्तमाळ परिसरात गेल्या होत्या. जळण गोळा करत त्या एका विहीरीपाशी आल्या. विहीरीलगत रस्त्याचे काम सुरू असल्याने खोदकामातून निघालेली माती विहीरीच्या कठड्यालगत टाकली होती. त्यामुळे या दोघींनाही विहीर दिसली नाही आणि त्या पाण्यात पडल्या. पोहता येत नसल्याने आणि आसपास वस्ती नसल्याने त्यांना वाचवण्यासाठी कोणाची मदत होवू शकली नाही. त्यातच त्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतदेह सांगलीतील हेल्पलाईन टीमने बाहेर काढले. दोघीही गर्भवती असल्याचे शवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट झाले.