आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महालक्ष्मी मंदिरात दोन स्कॅनर: सतेज पाटील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- 50 लाख रुपये खर्च करून महालक्ष्मी मंदिरात दोन स्कॅनर बसवण्यात येतील, अशी माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिराला भेट देऊन त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने सूचना केल्या.

राज्यातील प्रमुख मंदिरे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचे उपाय योजले जात आहेत. मात्र 2008 पासून महालक्ष्मी मंदिरात स्कॅनर बसवण्याचा प्रस्ताव धूळ खात पडून होता. ही यंत्रणा हाताळण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने आणि नवरात्रापुरतीच ही यंत्रणा हाताळण्यासाठी कंपन्या तयार नसल्याने निर्णय झाला नव्हता. आता तीन वर्षांसाठी एका सुरक्षा यंत्रणेकडे हे काम देण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसरात दोन मोबाइल टॉयलेट व्हॅन, विद्युत उपकरणे, जोडण्या ठीक करणे, क्लोज सर्किट टीव्हीची व्यवस्था करणे, जाहीर सूचना देण्यासाठी यंत्रणा उभारणे अशा अनेक सूचना पाटील यांनी देवस्थान समितीला केल्या आहेत.