आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकांना जुन्या सरकारची आठवण आल्यास आपण नालायक - ठाकरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - दिल्ली राज्यातील सरकार हे लोकांनी मोठ्या अपेक्षेने बदलले आहे. जर लोकांना पुन्हा जुन्या सरकारची आठवण आली तर आपण नालायक ठरू, अशा रोखठोक शब्दात सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि सर्वपक्षीय नेत्यांदेखत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला खडेबोल सुनावले.

कोल्हापूर जिल्ह्यातील हमीदवाडा येथे दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातील मंत्री हर्षवर्धन पाटील आणि पतंगराव कदम यांच्या भाषणांचा संदर्भ घेत ठाकरेंनी भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले की, राज्यातील शेतकरी अस्वस्थ आहे, हे खरे आहे. जर मंडलिक यांच्यासारखा माणूस २५ वर्षांपूर्वी एका नदीचे पाणी दुसऱ्या नदीत आणून शेती फुलवू शकतो तर आपल्याला काय अवघड आहे?

ठाकरे यांच्या आधी बोलताना सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सरकारने साखर उद्योग वाचवण्यासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली होती. कुणी कितीही कोल्हेकुई केली तरी याआधीच्या सरकारला जे निर्णय घेता आले नव्हते ते क्रांतिकारी निर्णय घेतल्याचे पाटील यांनी ठासून सांगितले होते. सरकारचे कुठे चुकत असेल तर ते चुकते हे म्हटले पाहिजे. उद्धव ठाकरेंनी हीच भूमिका घेतली असून त्यांच्या सूचनांचा आम्ही जरूर विचार करत असतो, असा उल्लेख पाटील यांनी केला होता. त्याचा संदर्भ देत ‘दादा, एक बरे झाले की तुम्ही आमच्या भावना समजून घेतल्या. मी जे काही मांडतो ती नुसती आदळआपट नाही. परंतु आम्ही जी आश्वासने देऊन सत्तेवर आलो त्याची पूर्तता करण्यासाठी उर्वरित.पान १०
दुष्काळालातोंड देण्यासाठी आता सत्ताधारी, विरोधक असा भेद करता सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, असे ठाकरे म्हणाले. यावेळी माजी राज्यपाल डी. वाय. पाटील, खासदार राजू शेट्टी यांची भाषणे झाली. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, निवेदिता माने, माजी मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्यासह अनेक आमदार, माजी आमदार उपस्थित होते.
सीमा प्रश्नीआपले वकील हजर रहात नाहीत: एकीकडेएक अधिवक्ता महाराष्ट्र तोडण्याची भाषा करतो. त्याला हाकलून द्यावे लागले. तर दुसरीकडे न्यायालयात आपली केस सुरू असताना कर्नाटक ज्या पध्दतीने कायदेशीर ताकद लावत आहे त्या पध्दतीने आपली ताकद लागत नाही. आपले वकील हजर रहात नाहीत अशी आपली माहिती आहे. याबाबत ठोस प्रयत्न करा असा माझा आग्रह असल्याचे उध्दव यांनी सांगितले.

सराफांच्या प्रश्नी लक्ष घाला
गेले ४० दिवस सुरू असलेल्या सराफांच्या प्रश्नात लक्ष घाला. त्यांना बोलवा, चर्चा करा, काही चुकत असेल तर सांगा. मात्र विषय संपवा. त्यांच्यावर आधारलेली लाखो कुटुंबे आज अडचणीत आली आहेत. हा प्रश्न संपवून टाका, असे आवाहन ठाकरे यांनी केले.

कुणीही अस्वस्थ राहू नये
लोकांनीअनेक अपेक्षा ठेवून आम्हाला सत्ता दिली आहे. जर शिवसेना सत्तेत असेल आणि लोक, समाजातील काही वर्ग अस्वस्थ असेल तर तसे होता कामा नये. माझ्या सरकारच्या काळात कुणी अस्वस्थ राहता कामा नये, असे ठाकरे म्हणाले.