आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray News In Marathi, Western Maharashtra, Divya Marathi

येणा-या काळात संपुर्ण पश्चिम महाराष्ट्र भगवा करू, उद्धव ठाकरे यांचा ठाम विश्‍वास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्‍ला असलेला पश्चिम महाराष्ट्र शिवसेनेसाठी कायम ‘राजकीय दुष्काळी’ होता; मात्र या बालेकिल्‍ल्याला आता निवडणुकीआधीच भगदाड पडले आहे. त्यामुळे येणा-या काळात संपुर्ण पश्चिम महाराष्ट्र भगवा करू’, असा ठाम विश्‍वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

खानापूर-आटपाडी विधासनभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनलि बाबर यांनी विटा येथे शिवसेनेत प्रवेश केला. त्यानिमित्त आयोजित मेळाव्यात ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, ‘कालपासून मी पश्चिम महाराष्ट्रात फरितोय. मला समाजातील सर्व वर्गातील लोक भेटून त्यांच्या व्यथा सांगत आहेत, त्यांचे प्रश्न सांगत आहेत. माझ्याकडे सत्ता नाही, मुख्यमंत्री नाही, तरीही लोक माझ्याकडे व्यथा मांडत आहेत. आघाडी सरकारची घटका भरली आहे आणि राज्यातही भगवा फडकणार, याचा आता लोकांनाही वशि्वास वाटू लागला आहे. म्हणूनच लोक वशि्वासाने माझ्यापुढे व्यथा मांडत आहेत.’

‘रोज शिवसेनेत कोणी ना कोणी प्रवेश करतो आहे, हे दृश्य पहायला शिवसेनाप्रमुख हवे होते. तसे हे घडते आहे, ते त्यांच्या पुण्याईमुळेच. तुम्ही माझ्यावर जे प्रेम दाखवता आहात, ते कोणत्या मुख्यमंत्र्याच्या वाट्यालाही आले नाही. युती सरकारने सुरू केलेल्या सिंचन योजना या आघाडी सरकारला पंधरा वर्षांत पूर्ण करता आल्या नाहीत. पश्चिम महाराष्ट्राने शिवसेनेला कधी फारसी साथ दिली नाही; पण आम्ही कधी दुजाभाव केला नाही. महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक माणूस माझा आहे, ही शिवसेनाप्रमुखांची भावना होती, तीच माझीही आहे. या भागातील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्यासाठी मी आलोय. आता तुमची साथ हवी,’ असे भावनिक अावाहनही उद्धव यांनी केले.
तीन तीन मंत्र्यांनी केले तरी काय?
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘सांगली जिल्‍्ह्याला तीन तीन वजनदार मंत्री मिळाले. पण यांनी काय केले? खरे तर एवढे मंत्री लाभल्यावर जिल्ह्याचे सोने व्हायला हवे होते. ते झालेही; पण त्यांचे स्वत:चे. त्यांच्या संस्था मोठ्या झाल्या, त्यांची घरे भरली, तुमचे काय? त्यांना तुम्हीच मोठे केले. तुम्ही जरा बाजूला व्हा, त्यांचे काय होईल पहा. तुमच्या मताची ही ताकद यावेळी दाखवा.’

माझा स्वार्थ लोकांसाठी
शिवसेनेत प्रवेश करण्यामागची भूमिका स्पष्ट करताना अनलि बाबर म्हणाले, ‘स्वार्थासाठी शिवसेनेत प्रवेश करतोय, असा माझ्यावर आरोप होतो आहे. होय मी स्वार्थी आहे, टेंभू योजना पुर्ण करण्यासाठी, लोकांना पाणी देण्यासाठी मी स्वार्थी झालो आहे. तुमच्या मतदारसंघातील गावांना पाणी देताना अनुशेष नसतो आणि आम्हाला पाणी देतानाच अनुशेष कोठून येतो?’ असा सवाल करत त्यांनी आर.आर.पाटील आणि पतंगराव कदम यांना विचारला.

लोकांचा दगडावर विश्‍वास; ‘दिल्ली पार्सल’वर मात्र नाही, मुख्यमंत्री चव्हाणांवर उद्धव ठाकरेंची टीका
‘पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीहून पाठवलेले पार्सल आहे. या मंडळींवर जनतेचा विश्‍वास राहिलेला नाही एकवेळ जनता दगडावर वशि्वास ठेवेल पण या ‘पार्सल’वर ठेवणार नाहीत. त्यामुळे आता आघाडीला घरी बसवाच,’ अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र साेडले.

दौलतनगर (ता. पाटण) येथील बाळासाहेब देसाई साखर कारखाना परिसरात झालेल्या सभेत ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, की आम्ही सत्तेवर आल्यावर काय करणार? असे काही जण विचारतात. मी सांगु इिच्छताे, की सीमा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. कर्नाटक सरकारने त्यांची बाजू लावून धरली, अाघाडी सरकारने मात्र काहीच केले नाही. तो प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. आघाडी सरकारने सत्ता हातात असताना केंद्रात आणि राज्यात केवळ घोटाळेच केले. हे घाेटाळे बाहेर काढण्याबराेबरच राज्याचा िवकास करणे व पारदर्शी कारभार हेच आमचे ध्येय अाहे,’ असे आश्वासन त्यांनी दिले.