आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकारने शेतकऱ्यांना रडवले, आता शेतकरी सरकारला रडवेल; उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली/कोल्हापूर- सरकारने शेतकऱ्यांना रडवले, आता शेतकरी सरकारला रडवेल, असे  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापुरातील गावांचा दौरा केल्यावर आज ते सांगलीत आले होते.

 

भाजप सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन औरंगजेबाला सळो की पळो करुन सोडलं. पण आज तोच शेतकरी रडतो आहे. आता हाच शेतकरी सरकारला रडवल्याशिवाय राहणार नाही.”

 

त्याआधी सकाळी वसंतदादा पाटील यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेत सांगली दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी वसंतदादांचे नातू आणि माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटीलही उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...