आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवसाचे पोर उडाणटप्पू निघाले तर बोलायचे कुणाला : उद्धव ठाकरे, शरद पावरांवरही केली टिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- ‘हे सरकार म्हणजे नवसाचे पोर आहे. त्यामुळे हे पोर जर उडाणटप्पू निघाले तर बोलायचे कुणाला? अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सत्ताधारी भाजपवर टीका केली.  कोल्हापुरात उद्धव यांनी उद्योजकांशी संवाद साधला. सरकारने शेतकरी, उद्योजक आणि व्यापाऱ्यांना देशोधडीला लावले असले तरी रामदेवबाबांसारखे नवे उद्योजकही पुढे येत आहेत, सरकारच्या जाहिरातबाजीवरही खोचक टीकाही त्यांनी या वेळी केली. भाजप सरकार फसवे अाहे, मग सोबत राहता कशाला? असे सांगणाऱ्या शरद पवारांनी १५ वर्षे काँग्रेसची भांडी घासली आहेत. यामुळे त्यांनी आम्हाला सांगू नये, असे तोडीस तोड प्रत्युत्तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. 

 


या भेटीत व्यापारी-उद्योजकांनी आपल्या अडीअडचणींचा पाढा वाचून दाखवताच उद्धव म्हणाले, 'हे सरकार म्हणजे नवसाचं पोर आहे. उडाणटप्पू निघालं तर विचारायचं कुणाला आणि बोलायचं कुणाला अशी मोठीच पंचायत झाली आहे.' कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने आयोजित केलेल्या या संवाद कार्यक्रमात व्यापाऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर शासनाला योग्य उपाययोजना करायला लावू, असे आश्‍वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. तसेच निवेदन स्वीकारून त्याच्या सुरळ्या जवळ ठेवण्यात आपल्याला रस नाही. समस्या तुमच्या आहेत त्या सोडवण्यासाठी सर्व व्यापारी उद्योजकांना एकत्र येऊन मोठे आंदोलन उभारावे लागेल. आंदोलन उभे करा. शिवसेना नेहमीच तुमच्या सोबत असेल, असेही ते म्हणाले.


निवडणुकांमागे निवडणूका जिंकायच्या आणि कारभार मात्र शुन्य अशी अवस्था या राज्य सरकारची झाली आहे. मूळचे उद्योजक तीन वर्षे रडत आहेत. मात्र रामदेव बाबा नव्याने उद्योजक म्हणून उभे राहिले आहेत, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी योवेळी केली. उद्योजकांकच्‍या अडचणींसंदर्भात 2 दिवसांची बैठक मुंबई येथे घेऊ, असे आश्‍वासनही त्‍यांनी उद्योजकांना‍ यावेळी दिले. बैठकीत खासदार गजानन किर्तीकर, जलसंधारण मंत्री विजय शिवतारे,खा. विनायक राऊत,आ. चंद्रदीप नरके, आ. सुजित मिणचेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार उपस्थित होते.

 

आमचा संसार कधी मोडतो याचीच पवार वाट पाहताय
'जे काम विरोधी पक्ष म्‍हणून पवारांना करायला हव होत, ते आम्‍हाला कराव लागत आहे. आमचा संसार कधी मोडतो याचीच पवार वाट पाहताय', अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांवर केली आहे.

 

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, उद्धव ठाकरे निवडणुकीच्‍या तयारीला?

 

हे ही वाचा,

दानवे म्हणाले- आगामी लोकसभा स्वबळावर लढणार; शिवसेनेबरोबर युती होणार नाहीच

बातम्या आणखी आहेत...