आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमा पानसरे यांच्या जबाबाला सुरुवात, गोविंद पानसरेंचे मारेकरी शोधण्यात अपयशच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या हत्येनंतर सुमारे अडीच महिन्यांनी त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांचा जबाब घेण्यास गुरुवारी सुरुवात झाली. पानसरेंकडून मिळणारा प्रतिसाद पाहून आणखी दोन टप्प्यांत त्यांचा जबाब घेण्यात येणार आहे.

१६ फेब्रुवारी रोजी पानसरे दांपत्य सकाळी फिरून येत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यामध्ये कॉ. गोविंद पानसरे यांचा चार दिवसांनी मृत्यू झाला होता. उमाताईंच्या डोळ्यासमोर ही घटना घडल्याने त्यांच्या जबाबाला मोठे महत्त्व आहे. मात्र, त्यांच्या तब्येतीचा विचार करून डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार पोलिस अधिकारी त्यांना भेटत होते.
नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या तपास पथकाचे प्रमुख संजयकुमार यांनी दोनच दिवसांपूर्वी उमाताईंची भेट घेतली होती. त्यानंतर कोल्हापूरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी उमाताईंचा जबाब घेतला. पानसरे यांच्या हत्येवरून राज्यभर वातावरण ढवळून निघाले असताना आता उमाताईंच्या जबाबाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.