आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Union Agriculture Minister Sharad Pawar Comment On LBT Issue

व्यापार्‍यांच्या संपामुळे मुंबई ठप्प होईल; एलबीटीवर तातडीने तोडगा काढा- शरद पवार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा/मुंबई- स्थानिक संस्था कर (एलबीटी) विरोधासाठी एकवटलेल्या व्यापारी संघटनांनी बेमुदत बंद पुकारला आहे. आता या संपाचा परिणाम मुंबईतही हळूहळू जाणवू लागला आहे. मुंबईतील व्यवहार ठप्प होऊ लागले आहेत. आणि ते राज्यासाठी परवडणारे नसल्याचे मत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे राज्य सरकारने एलबीटीवरून व्यापार्‍यांनी पुकारलेल्या संपावर तातडीने तोडगा काढावा, असाही सल्ला पवारांनी दिला आहे.
शरद पवार सातार्‍यात एका कार्यक्रमात बोलत होते.

एलबीटीविरोधात व्यापार्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे मुंबईत निर्माण होणार्‍या जीवनावश्यक वस्तुंच्या तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहे. दुसरीकडे व्यापार्‍यांनी आपलं आंदोलन आणखी तीव्र करण्‍याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय आता नाशिकच्या व्यापार्‍यांनी आता एलबीटीच्या बंदमध्ये उडी घेतली आहे.