आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • UPA, NDA Not Get Majority, Communist Party Of India Leader Vardhan's Estimation

यूपीए, एनडीएला बहुमत अशक्य; भाकपचे नेते वर्धन यांचे भाकीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- देशासमोरील महागाई, गरिबी यासारख्या प्रश्नांचे उपाय शोधण्याची चर्चा होण्याऐवजी प्रचाराला वेगळी दिशा देऊन राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशा लढतीचे स्वरूप दिले जात आहे. यूपीए भ्रष्टाचारामुळे आणि भाजप देशातील जनाधाराच्या भौगोलिक मर्यादेमुळे बहुमतात येणार नसल्याने तिसरी आघाडी निर्णायक भूमिका बजावणार असल्याचे भाकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ. ए. बी. वर्धन यांनी व्यक्त केले. या वेळी भाकपचे राज्य सचिव भालचंद्र कांगो यांची उपस्थिती होती.
ते म्हणाले, भाजप पाच राज्यांच्या निवडणुकांना लोकसभेची रंगीत तालीम म्हणून पाहत आहे. परंतु त्या त्या राज्यांचे प्रश्न वेगळे आहेत. तसेच सर्वच राज्यात मोदींचा प्रभाव दिसून येत नाही. मोदींचा प्रभाव हा भाजपच्या कार्यकर्त्यांपुरताच मर्यादित आहे. धर्मनिरपेक्ष समाजमनावर ते प्रभाव पाडू शकत नाहीत. काँग्रेसने जो कारभार केला आहे तो सर्वांसमोर आहे. त्यामुळे युपीएला 110 जागा मिळाल्या तरी खूप झाले. डाव्या पक्षांसह अन्य प्रादेशिक पक्षांच्या एकत्रिकरणाची प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे. नागरिकांना समर्थ पर्याय हवा असल्याचे ते म्हणाले. अनेक प्रादेशिक पक्ष त्यांच्या राज्यात सत्तेवर आहेत. त्यामुळेच ही मोट नीटपणे बांधली गेली तर नवे समीकरण वास्तवात येवू शकते असे ते म्हणाले.
दाभोलकरांच्या हत्येबाबत निष्कर्षाची घाई का ?
डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी सापडले नाहीत. दुसरीकडे हिंदुत्ववादी संघटनांना क्लीन चिट का दिली जाते. त्यांचे मारेकरी अजूनही मोकाट आहेत आणि जादूटोणा विरोधी कायदाही अजून मंजूर नाही. याचा जाब विचारू.
अण्णा हजारेंनी आता उपोषण करू नये
जनलोकपालचा अजेंडा देशासमोर आणण्याचे महत्त्वपूर्ण काम अण्णा हजारे यांच्या आंदोलनाने केले आहे. यापुढेही संघर्ष त्यांनी सुरू ठेवावा मात्र वयाचा विचार करून उपोषण मात्र करू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महाराष्‍ट्रात घुटमळायचं की नाही हे पवारांनी ठरवावं
मी एकदा शरद पवारांना म्हणालो की, तुम्हाला महाराष्‍ट्रातच घुटमळायचं असेल तर तुमचं आणि काँग्रेसचं जे काही चाललं आहे ते चालू देत. कारण काँग्रेस आणि राष्‍ट्रवादी हे फक्त दोन वेगळे चेहरे आहेत. बाकी सगळं एकच आहे. तसेच ते आता महाराष्‍ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्याही शर्यतीत नसल्यासारखे आहेत, असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला.