आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Valentine Day As Mother Day, Education Department Foolish Order

व्हॅलेंटाइन डे मातृदिन; शिक्षण विभागाचा वादग्रस्त आदेश रद्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळा, महाविद्यालयांना 'व्हॅलेंटाइन डे' हा मातृदिन साजरा करण्याचा आदेश दिला होता. मात्र चोहोबाजूने टीका झाल्यानंतर शुक्रवारी तांत्रिक कारण देत हा आदेश रद्द करण्यात आला. शहरातील काही सांस्कृतिक संस्थांनी मात्र हा दिवस शहिदांवर प्रेम व्यक्त करण्याचा दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
'व्हॅलेंटाइन डे'ला काही संस्था राजकीय पक्ष आक्षेप घेतात. महाविद्यालयांत तसेच शाळांमध्ये या दिवशी गैरप्रकारही होतात. यावर तोडगा म्हणून सातारा जिल्हा परिषदेने अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून हा दिवस मातृदिन म्हणून साजरा करण्याचे परिपत्रक काढले. काही शाळांनी त्या बाबत शंका उपस्थित केल्या. या निर्णयावर चोहोबाजूने टीकाही झाली. त्यामुळे शिक्षण विभागाचे प्रशांत अहिरे यांनी पुन्हा दुसरे पत्र काढून तांत्रिक कारणामुळे रद्द केला असल्याचे कळवले.
एकूणच मातृदिनाचे खूळ कोणी काढले होते आणि ते योग्य असेल तर ते रद्द का करण्यात आले यावर जिल्हा परिषदेच्या कोणीही उत्तर दिले नाही. त्यामुळे संभ्रम कायम असून काही सांस्कृतिक संस्थांनी हा दिन शहिदांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे.