आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालख्या, दिंड्या वाखरीत विसावल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- आषाढी एकादशीचा सोहळा केवळ दोन दिवसांवर आल्याने शनिवारी सायंकाळपर्यंत लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. राज्याच्या विविध भागांतून येणारे पालखी सोहळे पंढरीच्या उंबरठ्यावर वाखरी येथे विसावले होते. श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळे मुक्कामासाठी वाखरीत दाखल झाले आहेत. पंढरीच्या उंबरठ्यावर पालखी सोहळे आल्यामुळे श्री विठ्ठल दर्शनाच्या ओढीने सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांची आधीच पंढरीत दाखल होण्याच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळे आषाढ शुद्ध दशमीला रविवारी (दि. २६) संध्याकाळी येथे दाखल होतील. दरम्यान, येथे आलेल्या भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, शहरातील विविध रस्ते फुलून गेले आहेत. विविध मठ, धर्मशाळा व वाड्यांमध्ये भाविकांची गर्दी वाढताना दिसत आहे. येथे दाखल वारकरी भजन, कीर्तनात दंग असल्याने अवघी पंढरीनगरी भक्तिमय झाली आहे.