आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीरेंद्र तावडे, समीरच्या एकत्रित चौकशीची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- डाॅ.दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला सनातनचा साधक वीरेंद्र तावडे हा काही वर्षे कोल्हापुरात वास्तव्यास असल्याचे समाेर अाले अाहे. त्यामुळे सीबीआयच्या दोन अधिकाऱ्यांनी मंगळवारी शहरात येऊन काही जणांची चौकशी केली. तसेच तावडे आणि पानसरे हत्याप्रकरणातील संशयित समीर गायकवाड यांच्या समाेरासमाेर चाैकशीसाठी सीबीआय प्रयत्न करणार असल्याचे समजते.

तावडे काही वर्षे कोल्हापुरात वैद्यकीय व्यवसाय करत होता. त्याची अनेक ठिकाणी ऊठबस होती. सीबीआय अधिकाऱ्यांनी तावडे पोलिस कोठडीत असताना जी माहिती घेतली त्याआधारे हे अधिकारी दुपारी कोल्हापुरात आले होते. सायंकाळपर्यंत त्यांनी पाच जणांचे जबाब घेतले आहेत.
तसेच पानसरे हत्येप्रकरणी अटकेत असलेला समीर गायकवाड याला पुणे पोलिस ताब्यात घेण्याची शक्यता आहे. दाभोलकर आणि पानसरे हत्येमध्ये साम्य असल्याने समीर आणि तावडे यांची एकत्रित चौकशी करण्यासाठी सीबीआय प्रयत्न करत आहे. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाची उकल झाली तर त्यातूनच पानसरे आणि कलबुर्गी हत्या प्रकरणातील धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.