आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vidhansabha Election 2014 Sharad Pawar News In Marathi

राज्यातील जनता आघाडी सरकारला पुन्हा संधी देईल;शरद पवार यांचा विश्वास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - गेली१५ वर्षे राज्यामध्ये असलेल्या आघाडी सरकारने सर्वच क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करून महाराष्ट्राचा ठसा देशपातळीवर उमटवला आहे. त्यामुळे लोकसभेला जो अनपेक्षित निकाल लागला तो बाजूला ठेवून राज्यातील जनता पुन्हा एकदा आघाडीला संधी देईल, असा विश्वास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोमवारी कोल्हापुरात व्यक्त केला. पश्चिम महाराष्ट्रातील प्रचाराला सुरुवात करण्यात आली. या वेळी ते बोलत होते.

पवार म्हणाले, २२०४ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार केंद्रात असताना राज्यात मात्र मतदारांनी काँग्रेस आघाडीला निवडून दिले होते. १०० दिवसांमध्ये केंद्रातील कारभाराबाबत निष्कर्ष काढता येणार नाही. मात्र, देशाचा कारभार एकसंघ टीम चालवत नाही तर तीन चार लोकेेsच हा कारभार करतात असे चित्र निर्माण झाले आहे. एखाद्या राज्यात एखाद्या नेत्याच्या प्रभावाखाली कारभार चालणे वेगळे. परंतु देशाचा कारभार त्याच पद्धतीने चालणे हे चित्र चांगले नाही. शेतक ऱ्यांच्या प्रश्नाबाबत इथं जे बोलतात त्यांनी संसदेत काही मांडून, भांडून शेतकरी विरोधात झालेले निर्णय बदलून घेतले असं चित्र कधी दिसलं नाही अशा शब्दात पवार यांनी राजू शेट्टी यांचे नाव घेता टीका केली.

गेल्या १० वर्षांमध्ये शेतकऱ्यांची बाजू आम्ही किती खंबीरपणे घेतली होती हे लवकरच जनतेला कळेल, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. या वेळी हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, उपस्थित होते.

आघाडीव्हावी अशीच इच्छा : दोन्हीकॉंग्रेसच्या नेतृत्वाच्या मनामध्ये राज्यामध्ये आघाडी व्हावी अशीच इच्छा आहे. आमच्या मित्रपक्षाच्या नेत्या या परदेशामध्ये असल्याचा खोचक टोला त्यांनी लगावला.

आहेत. त्यामुळे त्या आल्यानंतर लगेचच चर्चेला सुरूवात होईल आणि येत्या तीन चार दिवसात जागा वाटपाचा विषय संपेल असे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीत आघाडी होणार असल्याचे संकेत त्यांना या बोलण्यातून दिले.