(संग्रहित छायाचित्र- अग्निप्रदीपन करताना विक्रमसिंह घाटगे)
कोल्हापूर- पश्चिम महाराष्ट्रातील सहकार चळवळीतील बडे नेते व सहकार महर्षी विक्रमसिंह घाटगे (वय- 66) यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. घाटगे यांच्या निधनाने कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
घाटगे यांनी कागल तालुक्यात छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना उभारला व तो नामांकित कारखाना सर्वांना परिचित आहे. घाटगे यांच्या नेतृत्त्वामुळे हा अल्पावधीतच आदर्श कारखाना म्हणून पुढे आला. अलीकडच्या काळात त्यांनी
आपल्या कारखान्यात रिफाईन्ड शुगर तयार करण्यास सुरुवात केली होती. राज्यात गेल्या काही वर्षात ऊसदरावरून आंदोलने झाली मात्र घाटगे यांच्या कारखान्यावर कधीही आंदोलन झाले नाही. कारण त्यांनी शेतक-यांना कायमच इतरांपेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न केला. सहकाराचे गाढे अभ्यासक असलेल्या घाटगे यांनी राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्षपदही भूषविले आहे.
सहकारासोबतच घाटगे यांनी राजकारणातही उत्तम काम केले. 80 च्या दशकात त्यांनी कागलची आमदारकी भूषवली होती.