आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vilaskaka Patil Undalkar Big Challenge For Prithviraj Chavan, Divya Marathi

बाबांना फोडला काकांनी घाम, दक्षिण कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणांसमोर काँग्रेस बंडखोर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सारी भिस्त ठेवून काँग्रेस विधानसभा निवडणूक लढवत आहे, परंतु चव्हाण यांना स्वत:च्या दक्षिण कराड मतदारसंघातच त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी व काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विलासकाका पाटील उंडाळकर मोठे कडवे उभे केले आहे. त्यातच राष्ट्रवादीने आपला उमेदवार मागे घेऊन उंडाळकर यांच्यामागे संपूर्ण ताकद उभी केली. त्यामुळे आपल्याच मतदारसंघातच अडकून पडण्याची वेळ चव्हाण यांच्यावर आली आहे. दुसरीकडे, मागील निवडणुकीत कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या डॉ. अतुल भोसले यांना यंदा भाजपने चव्हाणांविरोधात उभे केले आहे. त्यामुळे येथील लढत अधिकच रंगतदार होत आहे. एकूण नऊ उमेदवार मैदानात असले तरी संपूर्ण राज्याच्या नजरा चव्हाण, उंडाळकर आणि भोसले या तिघांवरच खिळल्या आहेत.
उंडाळकर यांनी या मतदारसंघातून तब्बल सात वेळा आमदारकी भूषविली आहे. ही आपली शेवटची निवडणूक असल्याची भावनिक साद ते घालत आहेत. तर कार्यकर्त्यांचे जाळे नसल्याने चव्हाण यांची कोंडी होत आहे, पण मुख्यमंत्री असताना केलेल्या विकासकामांच्या जोरावर त्यांना विजयाची आशा आहे.

विकासाचे दावे
चव्हाण यांनी मुख्यमंत्री झाल्यावर कराडच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. स्वत:कडे नगरविकास खाते असल्याने कराडची हद्दवाढ, मलकापूरला नगर पंचायतीचा दर्जा देणे, बस सेवा, मुलींना विशेष सवलती, पाण्याची २४ तास उपलब्धता यामुळे मलकापूर आणि कराडमध्ये चव्हाण यांची स्थिती भक्कम. काँग्रेसचे गट- तट एकत्र आणून व आपल्या समर्थकाची विधान परिषद व महामंडळावर वर्णी लावून त्यांच्या करवी जिल्ह्यात व मतदारसंघात काँग्रेसची स्थिती भक्कम करण्यावर चव्हाणांचा भर

पवारांची रणनीती
पृथ्वीराज चव्हाण व अजित पवार यांच्यात पहिल्यापासूनच विळ्या- भोपळ्याचे सख्य. आता आघाडी तुटल्याने तर चव्हाणांना निवडणुकीत पाडण्यासाठी राष्ट्रवादीने वेगळीच खेळी खेळली. आपल्या अधिकृत उमेदवाराला माघार घ्यायला लावत अजित पवारांनी पक्षाची संपूर्ण ताकद बंडखोराच्या पाठीशी उभी केली. पृथ्वीराज चव्हाण हे सध्या विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यामुळे कराडवासीयांनी आता उंडाळकरांना मत देऊन ‘एका बटणात दोन आमदार मिळवावेत’ असा प्रचार राष्ट्रवादीने सुरू केला आहे.

तिघेही प्रतिस्पर्धी मूळचे काँग्रेसी
विलास उंडाळकर, पृथ्वीराज चव्हाण, अतुल भोसले यांची मतदारसंघात पारंपरिक मक्तेदारी, पण कार्यक्षेत्रे वेगवेगळी असल्याने कधी समोरासमोर आले नव्हते. भोसले हे डॉक्टर, चव्हाण हे माहिती तंत्रज्ञान, तर उंडाळकर हे कायद्याचे पदवीधर असून काही काळ त्यांनी वकिलीही केली. तिघांचे राजकारण हे काँग्रेसच्या मुशीत घडले आहे.

संजय पाटील खून प्रकरणाचे भांडवल
संजय पाटील खून खटल्यात उंडाळकर यांचा मुलगा उदयसिंह तुरुंगात आहे. चव्हाणांमुळेच त्यांचा मुलगा तुरुंगात असल्याचा आरोप उंडाळकर गटाकडून होत आहे. दुसरीकडे, सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी राजकीय विरोधक संजय पाटील यांचा खून करण्याच्या थराला गेले. त्यामुळे स्वच्छ प्रतिमेच्या चव्हाणांना निवडून द्या, असा प्रतिवार चव्हाण गट करत आहे.
पुढे वाचा.... दिग्गज नेत्यांच्या लढती