आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vinayak Mete Criticizes Government Over Maratha Reservation

आरक्षणाबाबत मराठ्यांची शासनाकडून उपेक्षा : विनायक मेटे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- छत्रपती शाहू महाराजांनी 111 वर्षांपूर्वी आरक्षणाचा क्रांतीकारी निर्णय घेतला. परंतु आजचे सरकार मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिवसंग्रामचे संस्थापक विनायक मेटे यांनी शुक्रवारी केला. येथे आयोजित मराठा आरक्षण जागर परिषदेत ते बोलत होते.

आरक्षण जागर परिषद राज्यभर घेण्यात येणार असल्याचे सांगून मेटे यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली. ते म्हणाले, मराठा नेत्यांमध्येच आरक्षणासाठी आच नाही. त्यांना जागे करण्यासाठी या परिषदा असून मराठा आरक्षणाच्या विरोधात कुणीही असले तरी त्यांची पर्वा आम्ही करणार नाही. मराठ्यांचा इतर मागासांमध्ये समावेश करावा, अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे तर कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक तातडीने उभारावे, 60 वर्षांवरील शेतकरी, मजुरांना मासिक 2000 रूपये पेन्शन द्यावी,शेतमालाला रास्त भाव द्यावा आणि मराठा युवक युवतींना उद्यमशील बनवावे असे ठराव परिषदेत करण्यात आले. यावेळी डॉ. जयसिंगराव पवार, आण्णासाहेब साळुंखे, उपमहापौर परिक्षित पन्हाळकर, माजी महापौर कादंबरी कवाळे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.