आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरीतील पुजारी भरती प्रक्रिया तूर्त स्थगित; अभिप्राय मागवणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिरात पुजारी नेमणूकीची प्रक्रिया तूर्त स्थगित ठेवली आहे. यासंदर्भातील मंदिर समितीच्या अधिकाराचा मुद्दा वारकरी मंडळींनी उपस्थित केला आहे. त्यामुळे यासंदर्भात विधी व न्याय विभागाकडून अभिप्राय मागवणार असल्याचे मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी सोमवारी सांगितले.

डांगे म्हणाले, वारकरी सांप्रदायातील विविध संघटना व महाराज मंडळींनी सध्याची मंदिर समिती ही हंगामी स्वरुपाची असल्याने त्याला मंदिराविषयीचे महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे मंदिरातील पूजा, नित्योपचार व अन्य विधींसाठी पुजारी भरती करण्याचे हंगामी मंदिर समितीला अधिकार आहेत अथवा नाहीत, याविषयी शासनाच्या विधी व न्याय खात्याकडे पत्रव्यवहार करण्यात येईल. त्यांचा अभिप्राय आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.

17 जूनला बैठक
आषाढी एकादशी नऊ जुलैला आहे. त्यामुळे या यात्रेच्या नियोजनाविषयी पालकमंत्री दिलीप सोपल यांच्या अध्यक्षतेखाली 17 जून रोजी विविध शासकीय विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक एस.एस.विभुते यांनी दिली.