आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कल्याण-डोंबिवलीत सुमारे 48 टक्‍के, तर कोल्‍हापूरमध्‍ये 64 टक्‍के मतदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्‍हापूरचे जिल्‍हाधिकारी यांनी सपत्‍नीक मतदानाचा हक्‍क बजावला. - Divya Marathi
कोल्‍हापूरचे जिल्‍हाधिकारी यांनी सपत्‍नीक मतदानाचा हक्‍क बजावला.
कोल्‍हापूर / कल्‍याण - राज्‍यातील राजकारणात महत्‍त्‍वाच्‍या असलेल्‍या कोल्‍हापूर आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्‍या मतदानाला आज (रविवार) सकाळी 7.30 वाजतापासून सुरुवात झाली. सायंकाळी कोल्‍हापूरच्‍या 506, तर कल्‍याण-डोंबिवलीच्‍या 750 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. कल्याण-डोंबिवलीत सुमारे 48 टक्‍के, तर कोल्‍हापूरमध्‍ये 64 टक्‍के मतदान झाल्‍याचा अंदात वर्तवण्‍यात येत आहे.
 
थंडीमुळे सकाळी 8 वाजतापर्यंत मतदान केंद्रावर तुरळक मतदार दिसले. कल्याण-डोंबिवलीमध्‍ये 39 टक्के तर कोल्हापुरात दुपारी 3 वाजेपर्यंत 50 टक्के मतदान झाले होते. दरम्‍यान, राज्‍यात आणि केंद्रात मित्र पक्ष म्‍हणून सत्‍तेत असलेल्‍या शिवसेना आणि भाजप या दोन्‍ही पक्षांनी या निवडणुकीपूर्वी एकमेकांवर कडाडून टीका केली. दरम्‍यान, यात मनसेनेही उडी घेतली. त्‍यामुळे या तीनही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे.
 
कल्याण-डोंबिवलीत तीन गावांनी टाकला मतदानावर बहिष्‍कार
कल्याण-डोंबिवलीत महापालिका क्षेत्रातील 27 गावांपैकी उम्बरोली, भाल आणि दावडी  या गावांतील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. त्‍यांनी मतदान करावे, यासाठी प्रशासनाच्‍या अधिकाऱ्यांनी समजूत काढण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र, डंपिंग ग्राउंडच्या विरोधात आपली ही भूमिका असून, त्‍यावर ठाम राहण्‍याचा निर्धार ग्रामस्‍थांनी व्‍यक्‍त केला.
 
भाजपने टाकली वृत्‍तपत्रात प्रचारपत्रके
कल्याणमधील सारस्वत कॉलनीमध्ये  आज मतदानाच्या दिवशी भाजपने वृत्तपत्रांमधून प्रचारपत्रके टाकले. त्‍यामुळे आचारसंहितेचा भंग झाला असा  आरोप विरोधकांनी केला आहे. शिवाय या प्रकरणी भाजपवर कारवाई करावी, अशी मागणी  निवडणूक अधिका-यांकडे केली आहे. दरम्‍यान, निवडणूक अधिकाऱ्याने भरारी पथकाला पाचारण केले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे.
 
कोल्‍हापूर मतदान केंद्रावर वाद
कोल्‍हापुरातील सदर बाजार मतदान केंद्रावर आपला प्रतिनिधी येण्याआधी एव्हीए मशिन सुरू केल्‍याचा आरोप ताराराणी आघाडीच्‍या उमेदवाराने केला. त्‍यामुळे त्‍यांच्‍यात बाचाबाचीही झाली. त्‍यामुळे काही काळ तणावाचे वातावण निर्माण झाले होते.

डोंबविलीमध्‍ये पहिल्या तीन मतदारांना रोपटे
डोंबिवलीमध्‍ये मतदानासाठी आलेल्‍या पहिल्या तीन मतदारांना प्रशानाकडून तुळशीचे रोपटे देऊन त्‍यांचे स्‍वागत करण्‍यात आले.
 
पुढे वाचा, मनसेच्‍या कार्यकर्त्‍यांनी फोडल्‍या सेनेच्‍या कार्यकर्त्‍यांच्‍या गाड्या
बातम्या आणखी आहेत...