Home | Maharashtra | Western Maharashtra | Kolhapur | Vrinda karat attack on Modi Govt.

देशातील काॅर्पाेरेट घराण्यांचा शासकीय कामात हस्तक्षेप, वृंदा कारत यांचा सरकारवर अाराेप

प्रतिनिधी | Update - Jun 04, 2016, 02:14 AM IST

सध्या सरकारच्या कामात देशातील कॉर्पोरेट घराणी सरळसरळ हस्तश्रेप करत आहेत. हे केवळ देशातच नाही, तर जगभर घडत आहे.

 • Vrinda karat attack on Modi Govt.
  सांगली - सध्या सरकारच्या कामात देशातील कॉर्पोरेट घराणी सरळसरळ हस्तश्रेप करत आहेत. हे केवळ देशातच नाही, तर जगभर घडत आहे. हे भारतासाठी घातक आहे, असे मत माकपच्या नेत्या वृंदा करात यांनी व्यक्त केले.

  अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या दहाव्या अधिवेशनाच्या उद्घटनाच्या निमित्ताने करात शुक्रवारी सांगलीत आल्या होत्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना करात यांनी नरेंद्र मोदी सरकारवर टिकेची झोड उठवली. ‘‘सरकारने स्वत:च्या चुका झाकण्यासाठी जेएनयूसारखी प्रकरणे जाणीवपुर्वक चिघळवली. त्यामागे कोण होते, याची चौकशी नि:पश्रपाती होणारच नाही. मोदींनी 2 कोटी रोजगार निर्मितीचे वचन दिले होते. दोन वर्षांत केवळ 4 लाख रोजगार नव्याने निर्माण झाले. काळा पैसा देशात आणण्याचे वचनही त्यांना पाळता आले नाही. महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील आठ जिल्हे दुष्काळात होरपळत असताना मोदी जगभर फिरत होते; पण त्यांना मराठवाड्यात यायला वेळ मिळाला नाही, हे दुर्दैवी आहे.’’

  बंगालमध्ये गुंडगिरी
  बंगालमध्ये डाव्या पक्षांंना आलेल्या अपयशाबाबत त्या म्हणाल्या, ‘‘बंगाला पराभव आम्ही गांभिर्याने घेतला आहे. तिथे आम्हाला केवळ २० टक्के मते मिळाली. त्यावर तर काम करुच; पण सध्या बंगालमध्ये तृणमुल काँग्रेसच्या गुंडांची महिलांवर प्रचंड दहशत आहे. यावर आम्ही आवाज उठवत आहोत. महिलांवर अत्याचार होत आहेत आणि पोलिसांत तक्रार द्यायला गेल्यास धमकावले जात आहे. याचा आम्ही सरकारला जाब विचारणार आहोत.’’

  एकनाथ खडसेंना पाठीशी का घालता?
  ‘ना खाऊंगा ना खाणे दुंगा’ चा नारा देणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी एकनाथ खडसे यांचा राजीनामा घेण्याचे दूरच उलट त्यांना पाठीशी घातले आहे, असा आरोप करात यांनी केला. खडसेंना मोदीच नाही तर भाजपही पाठीशी घालत आहे, असेही वृंदा कारत म्हणाल्या.

Trending