आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरची तहान भागवण्यास धावणार \'पाणी एक्स्प्रेस\', ही आहेत पाणी टंचाईची कारणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली/लातूर- भीषण पाणी संकटात सापडलेल्या लातूरची तहान भागवण्यासाठी मिरजेतून रेल्वेद्वारे वारणा धरणाचे पाणी दिले जाणार अाहे. दर अाठ ते दहा दिवसांतून एकदा २५ लाख लिटर पाणी पुरवण्याचा निर्णय मंगळवारी झाला. महसूलमंत्री एकनाथ खडसे व लातूरच्या पालकमंत्री पंकजा मुंडेंनी पाहणी केल्यानंतर त्यावर शिक्कामाेर्तब झाले. रेल्वेमंत्री सुरेश प्रभुंनीही या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला.

मिरजेतून लातूरला रेल्वेने पाणी देणे शक्य असल्याचा प्रस्ताव भाजपचे पदाधिकारी मकरंद देशपांडेंनी मुख्यमंत्र्यांना पाठवला होता. त्याची व्यवहार्यता तपासण्यासाठी खडसे, पंकजा मुंडे, पाणीपुरवठा प्रधान सचिव राजेशकुमार, मदत व पुनर्वसन सचिव के.एच.गोविंदराज मंगळवारी मिरजेत आले होते. खडसेंनी रेल्वे, पाटबंधारे अधिकाऱ्यांशी चर्चा करून उपलब्ध पाणीसाठा, जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता, रेल्वे वाघिणीत पाणी भरण्यासाठी आणि लातूरला पाणी पाठवण्यासाठी लागणारा वेळ याबाबत चर्चा केली.

मिरज- लातूर थेट रेल्वेमार्ग आहे. या मार्गावरून एकावेळी ५० वाघिणींद्वारे २५ लाख लिटर पाणी वाहून नेणे शक्य आहे. ३६६ किलो मीटर अंतर कापून दहा तासांत ही रेल्वे लातूरला पोहोचू शकते. या पर्यायाने पाणीपुरवठा केला तर लातूरला दर आठ ते दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होऊ शकतो, असे या चर्चेतून स्पष्ट झाले. विशेष म्हणजे कर्नाटकने वारणा धरणातून चार टीएमसी पाण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. लातूरला अन्य मार्गांनीही पाणीपुरवठा करण्याचा विचार झाला; पण कमी कालावधीत पाणी पाठवण्यासाठी मिरजेचा पर्यायच योग्य आहे. शिवाय वारणा धरणात ११ टीएमसी पाणी असल्याने पुढील सहा महिने पाणीपुरवठा होऊ शकतो. मिरजेच्या जलशुद्धीकरण केंद्राची क्षमताही चांगली असल्याने कोणतीही अडचण येणार नाही. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही या पर्यायाला हिरवा कंदील दाखवला आहे. आजपासूनच पाणी पाठवण्यासाठीची तयारी सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुढील दहा दिवसांत पहिली रेल्वे पाणी घेऊन लातूरला जाईल. त्यानंतर रेल्वेच्या उपलब्धतेनुसार पाणी पाठवण्यात येईल, असे खडसे यांनी सांगितले. सध्या मिरजेत रेल्वेची स्वतंत्र जलशुुद्धीकरण यंत्रणा असली तरी नदीतून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत अतिरिक्त पाणी आणण्यासाठी स्वतंत्र पाइपलाइन टाकावी लागणार आहे. त्यासाठी काही कालावधी लागेल. त्यानंतर लातूरला नियमित पाणीपुरवठा होईल. वारणा धरणावर असलेल्या म्हैसाळ सिंचन योजनेवर मिरज, कवठे महांकाळ, जत तालुके अवलंबून. त्यांची गरज भागविल्यानंतरही पाणी शिल्लक राहते.
यामुळे उद्भवले पाणी संकट
लातूरमध्ये एकूण 13 साखर कारखाने आहेत. या शिवाय या भागातील इंडस्ट्रीयल एरिया मोठा आहे. त्याला मोठ्या प्रमाणावर पाणी पुरवठा करावा लागतो. वेळीच नियोजन न केल्याने लातूरमध्ये पाणी संकट उद्भवले आहे. प्रशासनाने पाण्याची उपलब्धता आणि उन्हाळ्यातील पाण्याची मागणी याची सांगड घातली असती तर लातूरमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली नसती. उन्हाळ्याच्या तोंडावर प्रशासनाला जाग आली आहे. त्याचा फटका स्थानिक लोकांना बसला आहे.
पुढील स्लाइडमध्ये,
>> रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग
>>आनंदवाडीचा हरवला आनंद
>> लातूर जिल्ह्यातील ७३१ गावांना ११४१ विहिरींद्वारे पाणी
>> रेल्वेस्थानक, विहिरीची पाहणी