आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याची टाकी काेसळली, सात वाहनांचा चुराडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा- जिल्ह्यातील तांबवे (ता. कराड) येथील पाण्याची टाकी रविवारी सायंकाळी काेसळली. सुदैवाने या दुर्घटनेत काेणती जीवितहानी झाली नसली तरी काही दुचाकी व चारचाकी सात वाहनांचे मात्र नुकसान झाले. सुमारे २५ लाख रुपये खर्च करून दीड वर्षापूर्वीच ही टाकी बांधण्यात अाली हाेती. त्यासाठी लाेकवर्गणीही गाेळा करण्यात अाली हाेती. विशेष म्हणजे एक लाख ३० हजार लिटर जलसाठ्याची क्षमता असलेल्या या टाकीचे बांधकाम करतानाच ते निकृष्ट दर्जाचे हाेत असल्याची तक्रार काही गावकऱ्यांनी करून ग्रामपंचायतीविराेधात अावाज उठवला हाेता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात अाले हाेते.
बातम्या आणखी आहेत...