आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • We Care The Drought Affected People Congress Leaders

आम्हाला दुष्काळी जनतेची काळजी - कॉंग्रेस नेते

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेले घमासान बाहेरून बघत बसलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी मंगळवारी या दोन्ही प्रश्नांच्या नेत्यांवर टीका करत काँग्रेस दुष्काळात जनतेची काळजी घेत असल्याचे ठासून सांगण्याचा प्रयत्न केला.

रोहयो मंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले, की ‘नकला आणि टवाळ्या करून दुष्काळ हटत नाही. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले. त्यावर सरकारला उपाय सुचवले. त्यांनी काय केले?’ राजीव सातव म्हणाले, ‘काही पक्ष एकमेकांवर टीका करण्यातच धन्यता मानतात. राज्यात दुष्काळी स्थिती आहे. एकमेकांची उणी-दुणी काढत बसण्याची ही वेळ नव्हे. अन्य पक्षांनीही रथयात्रा काढल्या, कोणी अभियान राबवले; मात्र आम्ही पदयात्रेतून लोकांनी मनी जोडण्याचे काम केले, मने दुभंगण्याचे नाही.’ माणिकराव ठाकरे म्हणाले, ‘काँग्रेसने विकासाचेच राजकारण केले. म्हणूनच युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 23 दिवस पदयात्रा काढून लोकांच्या भावना, सरकारकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही उगाचच उणी-दुणी काढत बसलो नाही, ठोस काम करण्यावर आमचा विश्वास आहे.’
विश्वजित कदम म्हणाले, ‘सिंचन प्रकल्पांवर झालेल्या खर्चाचे आपल्या मित्रपक्षाला एक ना एक दिवस लोकांना उत्तर द्यावेच लागेल. आता काहीही करून सरकारने अपूर्ण राहिलेले प्रकल्प पूर्ण करून लोकांना
पिण्यासाठी पाणी द्यावे.’