आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासातारा- ‘समाजात महिलांवर होणा-या अत्याचाराबाबत आपण नेहमीच बोलतो. तो दूर केलाच पाहिजे; परंतु घरात, घरच्यांकडून होणा-या अन्याय, अत्याचाराबाबत आपण कधी बोलणार ? त्यावर परिणामकारक काम कधी करणार?’ सवाल थेट सवाल राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी उपस्थित केला.
सातारा येथील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. गृहमंत्री आर. आर. पाटील, प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड,पालकमंत्री रामराजे निंबाळकर, आमदार विद्या चव्हाण आदी उपस्थित होते.
गृहमंत्री पाटील म्हणाले की, गावा-गावात महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले पाहिजेत. स्त्री भ्रूणहत्येमध्ये 50 टक्के महिलाही सामील असतात, त्या परिस्थितीमुळे सहभागी होतात. अशा अन्यायग्रस्त महिलांनी आम्हाला पत्र पाठवले तर लगेच कार्यवाही करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
शाहरूखला सुरक्षा
४एखादा रंग दहशतवादी आहे असे आम्ही मानत नाही. मात्र, रंगातील दहशतवाद आम्ही शोधून काढतो. राज्यातील कायदा सुव्यवस्था चांगली आहे. शाहरुखने आपण असुरक्षित असल्याचे म्हटल्याचे कळाल्याने मला आश्चर्य वाटले. त्याला सध्या सुरक्षा पुरविली जात आहे
आर. आर. पाटील, गृहमंत्री
33 % जागा मागणार
४आगामी निवडणुकीत 33 टक्के जागा महिलांसाठी मागणार आहोत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची निवड का रखडली, हा प्रश्न आम्हालाही पडला आहे, पण हा विषय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित येतो. महिलांपुढे प्रश्न अनेक आहेत ते सोडवण्यासाठी प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही राज्यभर मेळावे घेत आहोत.
सुप्रिया सुळे, खासदार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.