आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Why Should Hindutva Organization Keep Mumm On Murder, Duttaprasad Ask Question

हिंदुत्ववादी संघटना हत्येबद्दल गप्प का?, डॉ. दाभोळकर यांचे बंधू दत्तप्रसाद यांचा सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी सापडत नाहीत ही बाब खेदाची आहे. पण त्याहूनही वाईट बाब म्हणजे हिंदू धर्माबद्दल बोलणारे संघ, विहिंप व अभाविपचे कोणीही शब्दही काढत नाहीत,’ अशी खंत डॉ. नरेंद्र यांचे बंधू डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांनी ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केली. ‘पोलिसांवर आमचा विश्वास आहे, मात्र महिना उलटूनही जर मारेक-यांना पकडण्यात यश येत नसेल तर त्यांनी स्वत:हून सीबीआयकडे तपास सोपवावा,’ असे मतही त्यांनी व्यक्त केले.


पोलिस नक्की करतात काय? : राऊत
अंनिसचे ज्येष्ठ कार्यक र्ते शिवाजी राऊत यांनी पोलिस यंत्रणा नक्की काय करते, असा प्रश्न उपस्थित केला. महिना झाला तरी मारेकरी हाती लागत नाहीत. आम्ही संशय व्यक्त केलेल्या व्यक्ती सापडत नाहीत, हा प्रकार न कळण्यासारखा आहे. गोपनीयतेच्या पडद्याआड पोलिस तपास कुठपर्यंत पोहोचला हे समजण्यास मार्ग नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. पुण्यात डॉक्टरांची जिथे हत्या झाली तिथे शनिवारी आंदोलन करणार आहोत. मारेकरी लवकर सापडले नाहीत तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही राऊत यांनी दिला.