आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wife Burned For Not Gave Birth Boy, Incident In Kolhapur

मुलगा होत नसल्याने पत्नीला पेटवले; कोल्हापूरमधील घटना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - तीन मुलींच्या पाठीवरही मुलगा होत नसल्याने संतापलेल्या पतीने पत्नीलाच पेटवून दिल्याची घटना कोल्हापूरजवळील उचगाव येथे सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी पती आणि सासरा, सासू यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
उचगाव येथील हनुमाननगरमध्ये अल्ताफ चमनशेख यांचे कुटुंब राहते. अल्ताफ यांचा 2007 साली विवाह झाला. नंतर त्यांना तीन मुली झाल्या. मात्र मुलगा होत नसल्याच्या कारणावरून अल्ताफ पत्नी शहिता हिला कायम त्रास देत असे. सोमवारीही भांडण झाल्यानंतर अल्ताफने शिवीगाळ करत शहिताला पेटवून दिले. 95 टक्के भाजल्याने तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.