आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कु-हाडीचे घाव घालून पत्नी, दोन मुलांचा खून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - पत्नी आणि आपल्या दोन मुलांचा कुºहाडीचे घाव घालून खून केल्याची घटना म्हासोली (ता. कराड) येथे उघडकीस आली. याप्रकरणी आरोपी मन्सूर मकबुल मुल्ला याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याची 14 दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
मन्सूर मकबुल मुल्ला (35) हा नेहमीच आपली पत्नी पाकिजा हिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. यातून या दोघांमध्ये वाद होत असत. त्यामुळे पाकिजा म्हसोली सोडून मुसांडवाडी येथे राहण्यास जाणार होती. मात्र, त्याचा यास विरोध होता. या वादातूनच मन्सूरने आपली पत्नी, मुलगी अफरीन (3) व तीन महिन्याच्या जुबेरवर कुºहाडीचे घाव घालून त्यांचा खून केला. तसेच त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून जाळून टाकण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान, या घटनेची माहिती गावक-यांनी पोलिसांना दिली व पोलिसांनी आरोपीला अटक केली.