आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूरमध्‍ये गव्याच्या हल्ल्यात 6 जण जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - कांडगाव, हळदी परिसरात गव्यांनी गुरुवारी धुमाकूळ घातला. या वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात 6 जण जखमी झाले आहेत, तर दमछाक होऊन एका गव्याचाही मृत्यू झाला.

कांडगाव परिसरात बुधवारी रात्रीपासूनच 12 गव्यांचा मोठा कळप मुक्कामाला होता. त्यांनी या भागातील उसाच्या फडाची नासधूस सुरू केली होती. त्यामुळे ग्रामस्थांनी गव्यांनी हाकलण्याचा प्रयत्न केला. दिवसभर ही मोहीम सुरू होती. यातच काही गव्यांनी ग्रामस्थांना धडक दिल्याने सहा जण जखमी झाले. तर जीव वाचविण्यासाठी पळण्याच्या प्रयत्नात असणा-या एका गव्याचाही मृत्यू झाला.

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातही हत्तींचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. आजरा आणि चंदगड तालुक्यामध्ये पाणी प्रकल्प असल्याने हत्तींचा कळप या भागात फिरून दहशत निर्माण करत आहे.