कोल्हापूर - महालक्ष्मी मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश करून परतत असताना भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना झालेल्या मारहाणीची चौकशी सुरू अाहे. याबाबतचा अहवाल दोन दिवसांत येईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी दिली.
बुधवारी देसाई यांना महालक्ष्मी मंदिरात मारहाण झाली होती. बेशुद्ध अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल देण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी दिले आहेत. त्यानुसार चौकशीसाठी खास अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून दोन दिवसांत अहवाल येईल, असे देशपांडे यांनी सांगितले. दरम्यान, चित्रीकरणात जे दोषी दिसतील त्यांच्यावर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही दिल्या आहेत.
पुढे वाचा... २५० जणांविराेधात तक्रार त्र्यंबकेश्वरमध्ये महिलांची पाेलिसांत फिर्याद