आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलाकडून शेजारच्या काकूंची गळा चिरून हत्या; अतिप्रसंग करण्याचाही प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- प्रतिभानगर येथे फलॅटमध्ये एकट्या असलेल्या महिलेची चाकूने गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पूजा रमेश महाडीक (वय-38) असे या महिलेचे नाव आहे. अल्पवयीन आरोपी अफताब इब्राहीम सरकवास (रा. प्रतिभानगर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी आणि पूजा महाडीक एकाच अपार्टमेंन्टमध्ये राहात होते.

काय आहे हे प्रकरण?
- राजारामपूरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पूजा महाडीक फ्लॅटवर मृतावस्थेत आढळून आल्या होत्या.
- संशयित आरोपी अफताब इब्राहीम सरकवास (रा. प्रतिभानगर) याला अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.
- पूजा महाडीक यांचे पती कामावर गेले होते. त्यांची साडेचार वर्षाची मुलगी व पूजा महाडिक अशा दोघीच घरी असल्याचे पाहून संशयिताने खून केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
- खूनामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
- संशयिताने महिलेचे आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढून घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची कुजबुज परिसरात सुरु आहे.
बातम्या आणखी आहेत...