आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीला विहिरीत ढकलून अात्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा- कोरेगाव तालुक्यातील दुधी येथे दीड वर्षाच्या मुलीला विहिरीत ढकलून पित्यानेही अात्महत्या केली. दूर्वा जाधव असे मृत मुलीचे, तर उमेश भानुदास जाधव असे आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव आहे. त्यांच्या अात्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. सातारा येथे राहणारा उमेश जाधव (३४) हा मुलगी दूर्वाला घेऊन दुधी येथे अापल्या आजोळी गेला होता. मात्र, अचानक ताे घरातून निघून गेल्याने कुटुंबीयांनी त्याचा शाेध घेतला असता करतड शिवारातील विहिरीत दूर्वाचा, तर जवळच असलेल्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत उमेशचा मृतदेह अाढळून अाला. त्यांचे नातेवाईक हणमंत लाड यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.