आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Works For Farmers Still Last Breaths, Sharad Pawar Claimed

शेतक-यांच्या भल्यासाठी अखेरच्या श्‍वासापर्यंत काम करित राहील, शरद पवारांची ग्वाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - ‘अन्नसुरक्षा विधेयकाद्वारे देशातील 82 टक्के जनतेला पोटभर अन्न देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. गरजूंना नाममात्र दरात हे धान्य देण्यात येणार असले तरी शेतक-यांचे नुकसान होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत,’ असे सांगतानाच ‘शेतक-यांच्या भल्यासाठी अंतिम श्वासापर्यंत काम करीन राहीन,’ अशी ग्वाही केंद्रीय कृषिमंत्री यांनी सोमवारी दिली. साखरवाडी (ता.फलटण) येथील फलटण शुगर वर्क्स साखर कारखान्याच्या विस्तारीत गाळप प्रकल्पाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
पवार म्हणाले की, आम्ही जनतेला 3 रुपये किलो दराने तांदूळ व दोन रुपये किलो दराने गहू देणार आहोत. मात्र शेतक-यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, यासाठी आपण आग्रही आहोत. साखर निर्यातीतून सरकारला 2 कोटी 32 लाख हजार कोटी रुपये मिळाले आहेत. त्याचा उपयोग शेतकरी वर्गासाठी केला जाणार आहे. शेतक-यांना त्यांच्या घामाचा पैसा दिला जाणार आहे.
शेतकरी संघटनांच्या आंदोलनाबाबत पवार म्हणाले की, अशी आंदोलने करणे चुकीचे आहे. सहकारी कारखान्यांना अबकारी करावर प्रति टन 300 रुपये बिनव्याजी दिले आहेत. त्यामुळे ऊसाला योग्य दर मिळू शकेल. मात्र या आंदोलनांमुळे कारखाने उशिरा सुरू झाले. परिणामी प्रतिटन 3 हजार रुपये नुकसान झाले. 40 लाख टन साखरेचे सुमारे 1800 कोटी रुपये नुकसान झाले आहे. हे नुकसान केंद्र सरकार सहन करील, मात्र साखरेचे दर पडू देणार नाही.
राज्यातील शेतकरी कष्ट करत नाही. ऊस लावायचा आणि चौकात गप्पा मारायच्या असा दिनक्रम सुरू असतो. त्यामानाने कमी धारणक्षमता असणारे आणि दुष्काळी भागातील शेतकरी जास्त काम करुन इतर कृषी उत्पादने घेतात. विशेषत: सोलापूर, नगर भागातील शेतकरी उसाबरोबर इतर उत्पादने घेऊन सुस्थितीत आल्याचा दावा पवारांनी केला.
राज्यसभेवरच जाणार
आपण आता लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, की माढामधून उभेही राहणार नाही. गेल्या वेळी तेथील मतदारांना मला भरघोस मतांनी निवडून दिले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आता राज्यसभेच्या माध्यमातूनच संसदेत जाणार असल्याचा पुनरूच्चार पवारांनी केला.