आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्याेत अाणताना दरीत काेसळून युवकाचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला ताेरणा गडावरून अापल्या गावी शिवज्याेत नेताना एका युवकाचा पाय घसरल्याने दरीत पडून मृत्यू झाला. शंकर महादेव गायकवाड (२६, रा. मोरघर, ता. जावली) असे मृताचे नाव आहे.

सातारा जिल्ह्यात दरवर्षी शिवजयंती उत्सव माेठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. गुरुवारी मध्यरात्रीपासूनच जिल्ह्यातील विविध गावांतील मंडळांनी शिवज्याेत अापल्या गावी नेण्यासाठी ताेरणा गडावर गर्दी केली हाेती. रात्री साडेदहाच्या सुमारास शिवज्योत आणण्यास गेलेल्या शंकरचा कड्यावरून पाय घसरला तो दरीत काेसळला. रात्रीच्या अंधारात त्याचा शाेध लागू शकला नाही. शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात अाला. शंकर हा शिरवळ येथील औद्योगिक वसाहतीत कंपनीत नोकरीला होता. त्याच्या मृत्यूबद्दल गावातील शिवमंडळाने दुखवटा पाळला.