आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेजमधील वादातून युवकाला भोसकले, नंबर नसलेल्‍या बाईकवरून मारेकरी पळाले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - कोल्हापुरमध्‍ये इयत्‍ता बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्‍याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. राजवर्धन संभाजी गवळी असे मृत युवकाचे नाव आहे. तो विवेकानंद महाविद्यालयामध्‍ये शिकत होता.
कॉलेजमध्‍ये झालेल्‍या वादातून 18 वर्षीय राजवर्धनचा खून करण्‍यात आल्‍याचा अंदाज पोलिसांनी व्‍यक्‍त केला आहे. शुक्रवारी रात्री पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील उचगाव पुलाजवळ अत्‍यंत वर्दळीच्‍या ठिकाणी ही हत्‍या झाली अशी माहिती समोर आली आहे. परिसरातच राजवर्धनचे मित्रही होते. मित्रांनीच त्‍याला तत्‍काळ हॉस्‍पिटलमध्‍ये नेले.
धारदार शस्‍त्राने पोटात वार
- धारदार शस्‍त्राने राजवर्धनवर सपासप वार करण्‍यात आले.
- रात्री 11 च्‍या सुमारास हल्‍लेखोरांनी त्‍याच्‍यावर सुमारे 15 वार केले.
- राजवर्धनच्या पोटात, मांडीवर वार करून मारेक-यांनी पळ काढला.
- हल्‍ल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्‍थळी दाखल झाले.
- रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राजवर्धनला तत्‍काळ हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल केले.
- उपचारापूर्वीच राजवर्धनचा मृत्‍यू झाला.
- गांधीनगर पोलिस स्‍टेशनमध्‍ये या प्रकरणी खुनाचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा, हत्‍येनंतर मित्रांनी दिलेली माहिती...