आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन् युवराज संभाजीराजेंचे स्वप्न साकार, राष्ट्रपती कोट्यातून बनले राज्यसभेचे खासदार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - कोणत्याही परिस्थितीत खासदार होऊन दिल्ली दरबारी प्रश्न मांडून सोडवण्याची जबर इच्छा बाळगून असलेले कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर साकार झाले आहे. थेट राष्ट्रपतींच्या कोट्यातून त्यांना खासदार करत भाजपने एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत.

दहा वर्षांपूर्वी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसने कोल्हापुरातून लोकसभेसाठी संभाजीराजे यांना उमेदवारी दिली. मात्र, त्यांना तत्कालीन अपक्ष उमेदवार सदाशिवराव मंडलिक यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतरच्या विधानसभेतही त्यांचे कनिष्ठ बंधू आणि राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार मालोजीराजे यांचाही पराभव झाला. त्यामुळे छत्रपती घराण्याला या दोन्ही पराभवांचे मोठे शल्य होते. या पार्श्वभूमीवर लोकसभेला पराभव झाल्यानंतर राज्याभिषेक सोहळ्याच्या संयोजनाच्या निमित्ताने गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्यभर जागरण सभा घेत संभाजीराजे यांनी आपले काम सुरू ठेवले होते. रायगडावरील सुधारणांसाठी त्यांनी काही वर्षांपूर्वी पुरातत्त्व खात्याशीही पंगा घेतला होता. कोणत्याही वादात न अडकता एक सरळमार्गी असलेला राजघराण्यातील युवराज अशीच त्यांची प्रतिमा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांचे वारसदार म्हणून त्यांच्याबद्दल आदरही आहे. याच सर्व बाबींचा विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून संभाजीराजे यांचे नाव राष्ट्रपतींच्या यादीतून निश्चित केल्याचे समजते. नेहमीच्या राज्यसभेच्या राजकारणात संभाजीराजे यांना न ओढता सन्माननीय पद्धतीने त्यांचे नाव निश्चित केले गेल्याने कोल्हापुरात फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आला.
पुढे वाचा..
> शिवशाहूंचे विचार पुन्हा दिल्लीत मांडण्याची संधी
> आतापर्यंत केलेल्या शिवकार्याचा गौरव
बातम्या आणखी आहेत...