आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोकरीच्या अामिषाने एटीएम कोड विचारून शॉपिंग, तरुणाला घातला एक लाख नऊ हजारांचा गंडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- नोकरीचे अामिष दाखवून बँक खात्यात अाॅनलाइन पैसे भरण्यास सांगितले. त्यानंतर एटीएम कोड विचारत त्या अाधारे अनेक ठिकाणी खरेदी करून सोलापूर येथील एका व्यापाऱ्याच्या भावाला एक लाख नऊ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. व्यापारी रवी जबरचंद शर्मा (रा. पश्चिम मंगळवार पेठ, सोलापूर) यांनी जेल रोड पोलिसांत तक्रार दिली अाहे. 


१८ ते २० एप्रिलदरम्यान ही घटना घडली. शर्मा यांचे बंधू सोनू कुमार यांना मोबाइलवरून (८४७५००५३९८) कॉल आला. अापणास नोकरीची संधी अाहे, त्यासाठी सुरुवातीला थोडे पैसे अॅक्सिस बँकेत भरा, अापणास नोकरी मिळेल, असे सांगून बँकेचा खाते क्रमांक दिला. दोन दिवसांनी पुन्हा एटीएमचा कोड विचारून घेतला. त्याअाधारे भामट्यांनी विविध ठिकाणी एक लाख नऊ हजार रुपयांची खरेदी केली. पोलिस निरीक्षक पवार तपास करीत अाहेत. अद्याप चौकशी करायची अाहे. त्यानंतर अधिक माहिती मिळेल, असे पवार यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...