आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाबळेश्वरमध्ये प्रेमी युगलाची लग्नानंतर आत्महत्या, केटी पाॅईंटजवळ घेतला गळफास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- महाबळेश्वर येथील केटी पाॅईंटजवळ एक प्रेमी युगलाने आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. 

 

मिळालेल्या माहितीनुसार सांगलीतील अविनाश जाधव (28) आणि त्याची प्रेयसी तेजश्री नलावडे यांनी आत्महत्या केली आहे.  दोघांनी आधी लग्न केले आणि नंतर महाबळेश्वर येथे  गळफास घेऊन जीवन संपवले.  अविनाश सांगलीतील मानसिंग सहकारी बॅंकेत काम करत होता. या प्रेमी युगलाकडे एक चिट्ठी देखील आढळली आहे. दोघांनी चिट्ठीत कुणालाही दोषी धरु नये असे लिहिले आहे. पोलीसांनी तपास सुरु केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...