आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालवंडी-तुळजापूर रस्त्यावर अपघात, भावाच्या तिसऱ्या विधीला जाताना बहिणीचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा- सख्ख्या भावाच्या तिसऱ्या विधीसाठी पतीसोबत जाताना मोटारसायकल खड्ड्यात आदळल्याने बहिणीचा मृत्यू झाला. शनिवारी (दि. १६) सकाळी सव्वासहाच्या सुमारास मालवंडी-तुळजापूर रस्त्यावर गौडगावनजीक (ता. बार्शी) हा अपघात घडला.

 

नंदा जयकुमार मोहिरे (वय ५४, रा. अंजनगाव उमाटे, ता. माढा) असे तिचे नाव आहे. नंदा यांचे भाऊ नंदू कातकर (वय ५२, रा. वडगाव, ता. तुळजापूर) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. शनिवारी तिसरा दिवस होता. त्यासाठी पहाटे नंदा पतीसह निघाल्या असता हा अपघात झाला. 

बातम्या आणखी आहेत...