आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिनदर्शिकांवर कायदेशीर कारवाई करा, शिवराय-भीमराय संस्थेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- प्रकाशित झालेल्या विविध दिनदर्शिकांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन, गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस अशुभ वर्ज्य दिवस दाखविलेला आहे. तरी या दिनदर्शिकांवर प्रचलित कायद्याने कायदेशीर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. तत्पूर्वी शिवराय-भीमराय संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ त्या दिनदर्शिकांची उपस्थितांनी होळी केली. 

दिनदर्शिकांची चौकशी करून बाजार पेठेतून दिनदर्शिका मागवून ताब्यात घ्याव्यात. त्यांच्यावर बंदी आणून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना यशपाल सोनकांबळे, बाळू सुरवसे, अजय सोनवणे, विजय सोनवणे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.