आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Dabholkar, Pansare Bloodshed, Manth Prohibition

डाॅ. दाभाेलकर, पानसरे हत्याकांड : महिनाभर राज्यभर निषेध माेहीम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
- डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि अॅड. गोविंद पानसरे - Divya Marathi
- डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि अॅड. गोविंद पानसरे
सातारा- डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि अॅड. गोविंद पानसरे यांच्या खुनाचा तपास विशेष तपास पथकाकडे देऊनही मारेकऱ्यांचा शाेध लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर २० जुलै ते २० अाॅगस्ट या काळात राज्य व देशभरात समविचारी संघटनांचे कार्यकर्ते निषेध माेहीम राबवणार अाहेत. तसेच मारेकऱ्यांच्या अटकेची मागणी करणारी पत्रे देशभरातील महत्त्वाच्या व्यक्तींना पाठविण्यात येणार अाहेत, अशी माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डाॅ. हमीद दाभाेलकर यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. हमीद म्हणाले, ‘डॉ.दाभोलकरांच्या खुनाचा तपास सीबीआयकडे सुपूर्द करून एक वर्ष झाले, मात्र अद्यापही मारेकऱ्यांचा सुगावा लागलेला नाही. तपास करणाऱ्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांची सहा महिन्यांपासून बदली झाल्याचे आता समोर आले आहे. यावरून राज्य आणि केंद्र शासन हा विषय पुरेशा गांभिर्याने हाताळत नाही का? अशी शंका अाता येऊ लागली अाहे. त्यामुळे हा खुनाचा तपास आता न्यायालयाच्या देखरेखीत करावा अशी मागणी असणारी याचिका आम्ही दाखल करणार आहोत.
पानसरे यांच्या मारेकऱ्यांची छायाचित्रे प्रसिध्द झाली असताना गेल्या पाच महिन्यात विशेष तपास पथकाला ते सापडू शकलेले नाहीत. त्याचा अाम्ही निषेध करणार अाहाेत.’ तसेच राष्ट्रपती, पंतप्रधान,मुख्यमंत्री यांना अाम्ही ‘या खुनांचे झाले काय ?’ एवढा एकच प्रश्न विचारणारी एक लाख पाेस्टकार्डे पाठवणार अाहाेत. जुलै ते अाॅगस्ट या एक महिन्याच्या काळात लोकप्रतिनिधींना भेटणे, प्रबोधनाचे कार्यक्रम राबवणे, जिल्हानिहाय धरणे, निदर्शने -मोर्चा काढणे अादी अांदाेलन करण्यात येणार अाहे. ’

तसेच मुंबईत २० जुलै राेजी ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर प्रबोधन’ या अभियानास प्रारंभ होणार आहे. या निमित्त साॅर्केटिस ते दाभाेलकर, पानसरे व्हाया तुकाराम या रिंगण नाट्याचे प्रयाेग ठिकठिकाणी महिनाभर केले जाणार असल्याचे डाॅ. हमीद म्हणाले.