आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट निकालपत्र तयार करून वादी प्रतिवादींची फसवणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- येथील दिवाणी न्यायालयातील एका दाव्याचे खोटे निकालपत्र तयार करून वादी आणि प्रतिवादीला देऊन फसवणूक केल्याप्रकरणी एका वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अॅड. राजकुमार गायकवाड असे संशयित वकिलाचे नाव आहे.   

येथील दिवाणी न्यायालयात पुष्पा आदमिले, संभाजी आदमिले यांच्या वतीने अॅड. राजकुमार गायकवाड यांनी  जमिनीची वाटणी होऊन कब्जा मिळण्यासाठी सौदागर आदमिले यांच्यासह बारा जणांविरोधात दावा दाखल केला होता. हा दावा सध्या पंढरपूर येथील तिसऱ्या  दिवाणी न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणात न्यायाधीशांनी निकाल दिला नाही, तरीही अॅड. राजकुमार गायकवाड यांनी तीन फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत बनावट निकालपत्र तयार करून दाव्यातील प्रतिवादी यांच्या वकिलांना दिले. याबाबत प्रतिवादीच्या वकिलांनी न्यायालयात चौकशी केली. त्यांना असे कोणतेच निकालपत्र तयार झाले नसल्याचे न्यायालयातून सांगण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...