आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदयनराजेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला, मारहाण प्रकरणी अटक होण्याची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - खंडणी आणि धमकी दिल्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे उदयनराजे यांना या प्रकरणी अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.          

एका कंपनीच्या मालकाने उदयनराजेंच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यामुळे उदयनराजे यांनी या प्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर या दोघांच्या नेतृत्त्वात काम करणाऱ्या कामगार संघटनांच्या वादाचा या प्रकरणाशी संबंध असल्याची माहिती मिळाली आहे. उदयनराजेंसह काही सहकाऱ्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...