Home »Maharashtra »Western Maharashtra »Sangli» News About Funeral Of Aniket Kothale

दाेन महिने तपासणीनंतर अनिकेतवर अंत्यसंस्कार;पाेलिसांच्या मारहाणीत काेठडीत मृत्यू

काेठडीत पोलिसांच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या अनिकेत कोथळे याच्यावर सव्वादोन महिन्यानंतर सांगलीत अंत्यसंस्कार करण्यात

दिव्य मराठी वेब टीम | Jan 12, 2018, 02:53 AM IST

सांगली-काेठडीत पोलिसांच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या अनिकेत कोथळे याच्यावर सव्वादोन महिन्यानंतर सांगलीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरुवारी त्याच्या मृतदेहाचे अवशेष कुटुंबीयांनी सीआयडी कार्यालयातून ताब्यात घेतले.


६ नोव्हेंबर राेजी सांगली पोलिसांच्या मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आंबोली घाटात त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता. अनिकेतच्या हत्येप्रकरणी पोलिस अधिकारी युवराज कामटेसह १२ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे व उपअधीक्षक दीपाली काळे यांची बदली करण्यात आली होती. दरम्यान, मृतदेहाची तपासणी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दोन महिने करण्यात आली. त्यामुळे अनिकेतवर सव्वादोन महिन्यानंतर अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्याच्या कुटुंबीयांवर आली.


अनिकेतचा मृत्यू ७ नाेव्हेंबर राेजी अांबाेली घाटात सापडल्याचा पाेलिसांचा दावा हाेता. त्यानंतर पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. मात्र, त्यानंतर तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तब्बल दोन महिने तपासणी सुरू होती. तपासणीची ही प्रक्रिया दोन दिवसांपूर्वी पूर्ण झाली. त्यानंतर सीआयडीने अनिकेतचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.

पाच पेट्यांत सोपवले मृतदेहाचे अवशेष
अनिकेतची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. प्रयोगशाळेच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून तपास पूर्ण झाल्यानंतर पाच पेट्यांमध्ये त्याच्या मृतदेहाचे अवशेष सीआयडीकडे सोपवण्यात आले. त्यानंतर गुरुवारी अनिकेतचा भाऊ आशिष व अमित यांनी मृतदेह ताब्यात घेतला.

पुढे पाहा संबंधित PHOTOS...

Next Article

Recommended