आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनिकेत कोथळे खूनप्रकरण: SIT, उपअधीक्षक दिपाली काळेंना सहआरोपी करण्यासाठी याचिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिस कोठडीत मृत्यू झालेला अनिकेत कोथळे. - Divya Marathi
पोलिस कोठडीत मृत्यू झालेला अनिकेत कोथळे.

सांगली/कोल्हापूर- अनिकेत कोथळे खून प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SIT ची स्थापना करावी, सांगलीच्या तत्कालीन पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना सहआरोपी करावे यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी सांगलीचे पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे आणि उपअधिक्षक डॉ. दीपाली काळे यांची बदली करण्यात आलेली आहे.  

 

खून प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी, सीआयडीचे डीआयजी आणि आयपीएस दर्जाचे अधिकारी यांची मिळून एसआयटीची स्थापना करावी आणि कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी या मागण्यांसाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेवर 4 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. उद्या या मागण्यांसाठी सर्वपक्षीय कृती समितीचा सांगलीत मोर्चा आहे.  


सांगली शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत दि. 6 रोजी पोलिसांच्या मारहाणीत लूटमारीच्या गुन्ह्यातील अनिकेत कोथळे या संशयिताचा मृत्यू झाला होता. पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांनी सराईत गुन्हेगाराप्रमाणे त्यास नग्न करुन उलटे टांगले व मारहाण केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

 

मृत अनिकेत कोथळेच्या नातेवाईकांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्याप्रकरणी उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना सहआरोपी करण्याचा आग्रहही कोथळे कुटुंबियांसह सर्वपक्षीय कृती समितीने धरला आहे. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...