आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाट्यगृहांच्या सुधारणेसाठी कलावंतांनी पुढे यावे, विक्रम गोखलेंचे आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - ‘महाराष्ट्रातल्या अनेक शहरांत नाट्यगृहांची अवस्था दयनीय झाली आहे. ती सुधारण्यासाठी रंगभूमीवरल्या कलाकारांनीच पुढाकार घ्यावा’, असे आवाहन ज्येष्ठ नाट्यकर्मी व अभिनेते विक्रम गोखले यांनी गुरुवारी सांगलीत केले.

नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा फैयाज यांच्याहस्ते विक्रम गोखले यांना विष्णूदास भावे गौरव पदक प्रदान करण्यात आले. यावेळी गोखले यांनी राज्यातील नाटयगृहांच्या अनावस्थेबद्दल खंत व्यक्त केली. ‘कोल्हापूरात मी नाट्यगृहाच्या अनावस्थेमुळे प्रयोग अर्धवट सोडला आणि अशा नट्यगृहांत यापुढे कोठेही प्रयोग करणार नाही, असे सुनावले होते. त्यानंतर त्या नाट्यगृहाची सुधारणा झाली. सांगलीतल्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाची हीच अवस्था आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अनेक शहरांमध्ये हीच स्थिती आहे. ती सुधारायला हवी. त्यासाठी शासन, प्रशासनाने पुढाकार तर घ्यायलाच हवा; पण कलाकारांनीही पुढे यायला हवे,’ असे अावाहनही गाेखले यांनी केले.

विष्णूदास भावे गौरव पदक हे आपल्या आयुष्यातील सर्वोच्च सन्मान असल्याचे सांगताना ते म्हणाले, ‘विष्णूदास भावे हे केवळ मराठी रंगभुमीचे आद्य नाटककार नव्हते तर तर भारतीय रंगभुमीचे आद्य नाटककार होते, हे त्यांच्या पणतुने लिहीलेल्या ‘नाट्य प्रातीभ’ या पुस्तकातून मला कळाले. हे पुस्तक नाट्यशास्त्र शिकवल्या जाणारया सर्व विद्यापीठे, संस्थांमध्ये अभ्यासले जावे.’

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सांगली शाखेच्या वतीने गुरुवारी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा फैयाज यांच्या हस्ते विष्णुदास भावे गौरवपदक देऊन गाैरविण्यात अाले.
बातम्या आणखी आहेत...