आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्‍यात मोगलाई आलीय काय; सहकारमंत्र्यांचा सरकारला घरचा आहेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - राज्‍यात गुन्‍हेगार मोकाट आहेत. पोलिसांचा त्‍यांच्‍यावर असलेला वचक कमी झाला आहे. त्‍यामुळे राज्‍यात मोगलाई आली काय, असा प्रश्‍न खुदृ राज्‍याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (मंगळवार) विचारला. त्‍यामुळे भाजप सरकारला घरचाच आहेर मिळाला आहे. ते सांगली येथील पोलिस प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होते.
अगोदर चिक्‍की घोटाळ्यामुळे भाजप सरकारची प्रतिमा मलीन होत आहे. यात भरीस भर म्‍हणजे आता सरकारमधील मंत्री पाटील यांनी गृहविभागावर निशाणा साधला आहे. ते म्‍हणाले, ‘‘राज्यातील पोलिसांचा गुन्हेगारांवरचा वचक कमी झाला आहे, त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. पोलिसांचे आणि राज्यकर्त्यांचे लागेबांधे असतात. त्यामुळे गुन्हेगारांपैकी 92 टक्के गुन्हेगार सुटतात’’, असे वक्तव्यही यावेळी त्यांनी केले. राज्यात मोघलाई आली आहे काय असा गंभीर प्रश्न उपस्थीत करत आपल्याच सरकारवर त्यांनी टीका केली.