आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिकेत कोथळे खून प्रकरण: पोलिस ठाणे बनलेत सरकारी गुंडांचे अड्डे; संभाजी भिडे गुरुजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संभाजी भिडे गुरुजी यांनी याप्रकरणी सांगली पोलिसांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. - Divya Marathi
संभाजी भिडे गुरुजी यांनी याप्रकरणी सांगली पोलिसांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
सांगली- अनिकेत कोथळे खून प्रकरणामुळे पोलिस ठाणे हे सरकारी गुंडांचे अड्डे बनले असल्याचे समोर आल्याचे मत शिव प्रतिष्ठानाचे संभाजी भिडे गुरूजी यांनी व्यक्त केले आहे. दोषी पोलिसांना शिक्षा व्हावी यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
काय आहे पूर्ण प्रकरण
- विश्रामबाग पोलिस ठाण्यात अनिकेत कोथळेचा थर्ड डिग्रीमुळे मृत्यू झाला होता. पोलिसांनी हे प्रकरण दाबण्यासाठी त्याचा मृतदेह 100 किलोमीटर दूर नेत आंबा घाटात जाळला होता. 
- त्यानंतर पोलिसांनी आरोपी कोठडीतून पळून गेल्याचा बनाव रचला. पण कुटूंबाला यावर विश्वास नसल्याने त्यांनी या प्रकरणात पोलिसांकडे सीसीटीव्ही फुटेज व पुरावे मागितले. त्यानंतर पोलिसांचे बिंग फुटले. 
- या घटनेनंतर पोलिस निरीक्षकासह 12 पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर पोलिस निरीक्षक युवराज कामटे याला अटक करण्यात आली आहे. 
 
भिडे गुरुजींनी लावले हे आरोप
- अनिकेच कोथळे खून प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेविरोधात सोमवारी सांगलीत बंद पुकारण्यात आला होता. भिडे गुरुजी हे या आंदोलनात सामील झाले होते. त्यांनी पोलिसांवर हे सगळे पैशासाठी केल्याचा आरोप केला.
- या प्रकरणात डीवायएसपी दीपाली काळे या दोषी असल्याचा आरोप त्यांनी केला. सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. 
- दोषी अधिकाऱ्यांना फासावर न लटकल्यावर लोकांचे पोलिस कोठडीत असे बळी जातील, असे त्यांनी म्हटले आहे. 
 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...