आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठीचा आग्रह हवाच, पण जगाची भाषाही शिकावी : शरद पवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - ‘मराठीची अस्मिता जपलीच पाहिजे; पण जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी आपली मुले तयार व्हावीत यासाठी जगाची भाषाही शिकली पाहिजे,’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केले.

यंग मेन्स एज्युकेशन सोसायटीच्या अमृतमहोत्सव सांगता समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संस्थेचा कारभार अध्यक्षा मेघना कोरे पाहतात, हा धागा पकडून पवार म्हणाले, ‘जगातील प्रगत देशांच्या विकासात महिलांचाच अधिक वाटा राहिला आहे. महिलांच्या सहभागाशिवाय देश घडत नाही. मी संरक्षणमंत्री असताना अनेक देशांत गेलाे. तिथे मला लष्करात महिला कार्यरत दिसल्या. आपल्याकडे त्या वेळी लष्करात महिला नव्हत्या. मी आग्रहाने महिलांना भरती केले. त्यानंतर हवाई दलात महिलांच्या सहभागामुळे अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. महिला जबाबदारीने काम करत असल्याने अशा संस्थांची कामगिरी दर्जेदार झाल्याची उदाहरणे आहेत.’
सध्या सर्वत्र इंग्रजी शाळा सुरू होत आहेत. यावर टीकेचा सूर उमटत असल्याबद्दल पवार म्हणाले, ‘इंग्रजी ही जगाची भाषा आहे. मराठी ही आपली स्थानिक भाषा आहे, तिचे महत्त्व अबाधित आहे. त्यामुळे मराठीचा आग्रह तर धरलाच पाहिजे; पण आपली मुले जागतिक स्पर्धेत तयार झाली पाहिजेत. त्यासाठी इंग्रजी शिकणेही तितकेच महत्त्वाचे आहे. तिचा तिरस्कार करून आपण जागतिक स्पर्धेला तोंड देऊ शकणार नाही.’
बातम्या आणखी आहेत...