आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगलीमध्‍ये लग्नाच्या रिसेप्शनमध्ये 40 जणांनी केले रक्तदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली- ‘पीपल फर्स्ट, मिशन आॅल्वेज’ हे बोधवाक्य घेऊन देशसेवा करणाऱ्या भारतीय हवाई दलातील अधिकारी रोहित पाचोरे या तरुणाने आपल्या लग्नाच्या रिसेप्शनला रक्तदान शिबिराचे आयोजन करून समाजाला वेगळी दिशा दाखवली आहे. या शिबिरात ४० जणांनी रक्तदान केले.

रोहित हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरचा. भारतीय हवाई दलात सध्या तो चेन्नई येथे लॉजिस्टिक विभागाचा प्रमुख आहे. रोहित हा दरवर्षी तीन वेळा रक्तदान करतो. लोकांना गरज असेल तेव्हा रक्तदान तर केलेच पाहिजे; पण आपल्याला शक्य असेल तेव्हा रक्तदान करून लोकांची रक्ताची गरज पूर्ण केली पाहिजे, ही रोहितची भावना. त्याचे मामा सांगलीतील सुप्रसिद्ध वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी होत असलेल्या रक्तदान शिबिरातही रोहित रक्तदान करतो.
सांगलीतील नयन वठारे या तरुणीशी राेहितचे १० जुलैला सांगलीत लग्न झाले. त्यानंतर ११ जुलैला त्याने रिसेप्शन पार्टी ठेवली होती. त्याच वेळी त्याने या पार्टीतच सांगलीतील शिरवागकर ब्लड बँकेच्या मदतीने रक्तदान शिबिर घेतले. त्याच्या लग्नासाठी चेन्नई, गुरगाव, अमृतसर, जैसलमेरहून आलेले हवाई दलातील २० सहकारी आणि आणखी २० नातेवाईक, मित्र अशा ४० जणांनी या शिबिरात रक्तदान केले.
लग्नही इको-फ्रेंडली
रोहितचे मामा प्रमोद चौगुले हे पर्यावरण रक्षणाचा जागर करणाऱ्या सांगलीतील आभाळमाया फाउंडेशनचे संस्थापक. पर्यावरण रक्षणाची मामांकडून प्रेरणा घेतलेल्या रोहितने लग्नाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत लग्नही पर्यावरणपूरक केले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...