आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उजनीत आले फक्त एक टीएमसी पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अर्ज,सुनावणी, तक्रारी या प्रक्रियेनंतर सोलापूरला टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश जलसंपत्ती प्राधिकरणाने दिले होते. आदेशाची अंमलबजावणी झाली खरी मात्र त्याचा फारसा लाभ सोलापूरकरांना होण्याची शक्यता कमीच आहे. शुक्रवारपर्यंत पुणे जिल्ह्यातील भामा-आसखेड चासकमान या धरणातून टीएमसी पाणी सोडण्यात आले असून धरणातील पाणीसाठ्यात एक टीएमसी वाढ झाल्याचे उजनी लाभक्षेत्र कार्यालयाकडून सांगण्यात आले. १८ जानेवारी रोजी धरणामध्ये ५७.४७ टीएमसी पाणी होते,यामध्ये वाढ होऊन शुक्रवारी ५८.५० टीएमसी पाणी उपलब्ध अाहे.

सोलापूर जिल्ह्यातील शेतीसाठी पुणे जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याची ही प्रक्रिया २२ ऑक्टोबर रोजी सुरू झाली होती, ती शुक्रवारी (दि. २२) पूर्ण झाली. ९० दिवस, जलसंपत्ती प्राधिकरणसमोरील दोन वेळा सुनावणी आणि उच्च न्यायालयाचे आदेश या प्रक्रियेनंतर सोलापूरला टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला. मात्र त्यातील प्रत्यक्षात उजनी धरणामध्ये २२ जानेवारीअखेर फक्त एक टीएमसीच पाणी आले आहे. शुक्रवारी ५४७ क्युसेक्सने विसर्ग सुरू असला तरी पाणीसाठ्यात खूप मोठी वाढ होईल, अशी कोणतीही अपेक्षा नाही.